नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शनिवारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने गोरेगाव मधील जणजीवन झाले होते विस्कळीत – आजचा महाराष्ट्र

शनिवारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने गोरेगाव मधील जणजीवन झाले होते विस्कळीत

प्रतिनिधी पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) – गोरेगांवमध्ये शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने, गोरेगांवमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच शहराच्या एक ते दिड किलोमीटर परिसरात कुठेतरी वीज पडल्याने, गोरेगांवातील अनेकांची विद्युत उपकरणे बाद झाली. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. शनिवारी (दि.१४) सायंकाळी चार वाजल्यापासून पावसाने बराच काळोख केला आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.   बघता बघता पावसाने रौद्ररुप धारण केले. त्याचवेळेस वीज कोसळली. या मुसळधारेने गोरेगांव शहराच्या

सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. मलिकार्जुन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चिचंवलीवाडी येथील मुकुंदनगर भागात डोंगरावरील पाणी खाली येऊन, संपूर्ण मुकुंदनगर जलमय झाले. मुकुंदनगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. मुकुंदनगरमधील वामन बैकर यांच्या घरामध्ये जवळपास फुटभर पाणी शिरले होते.  रविवार सुटीचा दिवस असल्याने त्यादिवशी नुकसानीचा पंचनामा होऊ न शकल्याने त्यांचे कितीचे नुकसान झाले हे समजू शकले नाही.  गोरेगांव परिसरात वीज कोसळल्याने महावितरणचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला, तर बर्‍याच जणांच्या घरामधील विद्युत उपकरणे, सेटटॉप बॉक्स आणि वायफायचे राऊटर नादुरुस्त झाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा