पूल कोसळून बापलेकाचा मृत्यू, आई गंभीर जखमी (पर्यटनाचा प्लॅन जीवावर बेतला)

प्रतिनिधी अशोक वस्तानी
पुणे (मुळशी) :- पुण्यातील तळेगावजवळील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत अनेक पर्यटक नदीत पडून वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापैकी चौघा जणांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध सुरू आहे. या पुलावरून पडल्याने सुमारे ५० पर्यटक जखमी
झाले असून, त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहॆ मृतांमध्ये सहा वर्षांचा चिमुकला आणि त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. रोहित माने आणि विहान माने असे मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे. तर चंद्रकांत साठले आणि अन्य एका व्यक्तीचा देखील यात मृत्यू झालेला आहे. विहानच्या आजीने आपल्या नातवाच्या शोधासाठी सर्वांसमोर पदर पसरला होता, मात्र दुर्दैवाने नातू आणि जावई अशा दोघांनाही प्राण गमवावे लागले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space