नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील जुना पूल वाहून गेला – आजचा महाराष्ट्र

कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील जुना पूल वाहून गेला

प्रतिनिधी सतिश वि.पाटील 

मुंबई :- इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सुरू पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुका रविवारी सुटटीचा दिवस असल्याने अनेक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, दुपारच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळला आणि पुलावर उपस्थित असलेले पर्यटक वाहून गेल्याची

भीती व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. आता प्रशासकीय अधिकारी, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.इंद्रायणी नदी पूल परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर होती. तर काही पर्यटकांनी दुचाकी नेल्याचं बोललं जात आहे. परिणामी ओव्हरलोड झाल्याने हा पूल कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं, “पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही

घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”इंद्रायणी नदीच्या पात्रात असलेले कुंडमळा येथे दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रविवार आणि त्यातही सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटनस्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा पूल खूप जुना होता. पूल कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीये. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती समोर आली. पूल कोसळल्याने त्या पुलावर उपस्थित असलेले पर्यटक खाली पडले आणि इंद्रायणी नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने हे पर्यटक वाहून गेल्याचं बोललं जात आहे.मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट द्यायला येत असतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर हा पूल आहे. हा पूल ज्या ठिकाणी होता तो परिसर खडकाळ आहे आणि त्यामुळे बचाव तसेच मदतकार्य करण्यातही अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा