अलिबाग मच्छिमार सोसायटीच्या विशेष सभेतून प्रशासक निलेश शिंदे यांनी काढला पळ अन् मोबाईल ठेवला बंद

प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड (अलिबाग) – रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी लि.ची तेरा सदस्य निवड करण्यासाठी लावण्यात आलेल्या विशेष सभेतून उपस्थित सदस्य आणि नागरिकांचा रुद्रावतार दिसल्याने प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) निलेश शिंदे यांनी भर सभेतून पळ काढल्याने उपस्थित सभासद व इतर ग्रामस्थ यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद ठेवल्याने संपर्क होत नव्हता.अलिबाग मच्छिमार सोसायटीची आज तेरा सदस्य यांची नवीन कार्यकारिणी मंडळ सदस्य यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या अधिमंडळाची विशेष बैठक निलेश शिंदे, प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १२/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता अलिबाग मच्छिामार सहकारी सोसायटी लि. अलिबाग जि. रायगड संस्थेच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्याबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र सदर सभा ही नोटीस मध्ये दिलेल्या ठिकाणी मी घेत ती संस्थेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या श्री खंडोबा मंदिर सभागृहात घेण्यात आली. यावेळी सभा सुरू होण्यापूर्वी काही सदस्य यांनी संस्थेच्या काही सभासद यांना विविध प्रकारच्या समस्या मच्छिमार बांधवांना सतत सतावत आहेत. यामुळे त्याचा विकास कुठे तरी खुंटला आहे.तर काहीजण संस्थेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्याचे कार्यदेखील करीत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे.संस्थेच्या मच्छिमार बांधवांच्या सर्वांगिण विकासा व्हावा यासाठी सन २०२१-२०२६ ते २०३०-२०३१ या कालावधीसाठी नेमण्यात येण्याचे कार्यकारी मंडळ हे सभासद यांच्याकडून निवडून येणे गरजेचे आहे. यासाठी लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचा अवलंब करून सदर निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेण्यात यावी सदर निवडणूक घेत असताना निवडणूक आयोग यांचे निवडणूक संदर्भात असलेले नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. अशी मागणी यावेळी शिंदे यांच्यासमोर केली. मात्र जुने संचालक मंडळ यांनी त्यास विरोध केला असल्याने सभेत मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू झाला. या गदारोळात गुप्त मतदान घेण्यात यावे यासाठी काही सभासदांनी रुद्र अवतार धारण केले त्यांनी या बिनविरोध निवडणुकीला विरोध करीत असताना ही जुन्या संचालक मंडळापैकी काही सदस्य यांची बिनविरोध निवड केली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशाच थेट इशारा दिला.यावेळी अलिबाग मच्छिमार सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) निलेश शिंदे यांनी सदर निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात येईल असे तोंडी आश्वासन देत सचिव अमृत भगत यांच्या समवेत भर सभेतून पळ काढला . मात्र उपस्थित सभासद व इतर ग्रामस्थ यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद ठेवल्याने संपर्क होत नव्हता.यानंतर संतप्त सभासद व ग्रामस्थ हे प्राधिकृत अधिकारी नीलेश शिंदे यांची भेट घेत लेखी म्हणणे घेण्यासाठी अलिबाग मच्छिमार सोसायटीच्या कार्यालयात गेले होते. मात्र तिथेसचिव अमृत भगत उपस्थित होता. मात्र निलेश शिंदे तेथून गायब झाले होते.त्यानंतर संतप्त झालेले सभासद व नागरिक यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात जाऊन जिल्हा निबंधक प्रमोद जगताप यांची भेट घेऊन सविस्तर माहिती कथन केली. त्यांनी त्यांनी सुद्धा प्राधिकृत अधिकारी शिंदे यांना संपर्क करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना सांगितले मात्र त्यावेळी सुद्धा शिंदे यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.त्यावेळी जिल्हा निबंधक प्रमोद जगताप यांनी उपस्थित सभासद आणि नागरिक यांना माहिती देताना सांगितले की प्रशासक काळात संस्थेच्या सभासद करून घेण्यासाठी कोणी अर्ज केले असतील तर त्यावर योग्य निर्णय घेऊन त्यास सभासद करण्याचा अधिकार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space