सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय – लढ्याला मिळाले यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
प्रतिनिधी
मुंबई : दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. श्री. आकाश फुंडकर साहेबांनी सुरक्षा रक्षकांसाठी खाकी वर्दी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. यासाठी मा. मंत्री महोदयांचे मन:पूर्वक आभार.या निर्णयासाठी २०१४ पासून सात जिद्दी सुरक्षा रक्षकांनी सुरू केलेल्या लढ्याला आज यश मिळाले. या लढ्यात त्यांनी अखंड महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना एकत्रित करून जनजागृती केली. सुमारे ४०,००० सह्यांची मोहीम राबवून, त्या तत्कालीन कामगार मंत्री मा. संभाजी पाटील निलंगेकर साहेबांकडे सादर करण्यात आल्या, तरीही काही कारणास्तव निर्णय होऊ शकला नाही.अपयश आले तरी खचून न जाता, या सात जणांनी दिल्लीपर्यंत लढा सुरू ठेवला. अनेक संघटना, आंदोलने, उपोषणं
यात सहभागी झाली, तरीही निर्णय झाला नाही.या वेळी मा. श्री. मारुती झाडे (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक व जनरल कामगार संघटना) यांनी या प्रकरणातील अडथळ्यांचा शोध घेतला असता, कामगार विभाग नव्हे तर गृह विभागातच निर्णय अडकला आहे, हे उघड झाले. त्यांनी अमरावतीचे अमित देशे व मनीष सोनी यांच्याशी संपर्क साधून, रामभाऊ अहीरवार (भाजपा दक्षिण, पश्चिम, विधानसभा, महामंत्री ) यांच्या माध्यमातून तत्कालीन गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठक आयोजित केली.या बैठकीत मारुती झाडे व त्यांचे सहकारी अविनाश कदम (अध्यक्ष माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक व जनरल कामगार संघटना) यांनी फडणवीस साहेबांना मुद्दा सविस्तर समजावून सांगितला. त्यानंतर फडणवीस साहेबांनी त्यांच्या सचिवांना तात्काळ आदेश देऊन, वर्दीचा प्रश्न निकाली काढण्यास सांगितले.आज त्या निर्णयाचा प्रत्यक्ष अंमल झाला असून, सर्व सुरक्षा रक्षकांसाठी खाकी वर्दी लागू झाली आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल मा. मारुती झाडे यांनी सर्व संघटनांचे आभार मानले आणि सुरक्षा रक्षकांनी नव्याने मिळालेल्या वर्दीचा सन्मान करावा, तिचा अवमान होऊ नये, असे आवाहन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space