नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अपार आयडीच्या कामात शिक्षकांची वाढली डोकेदुखी – आजचा महाराष्ट्र

अपार आयडीच्या कामात शिक्षकांची वाढली डोकेदुखी

प्रतिनिधी सचिन चौरसिया

पालकाचे पोर्टलवर एक नाव तर आधारवर दुसरेच शिकवावं तर कधी, पालकांची वाढली चिंता

नागपुर (रामटेक) :- शिक्षण विभागाने विद्यार्थीचा ‘अपार आईडी चा आदेश काढला आणि इयत्ता १ ते १२ वी पर्यतचे सर्वच जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शिक्षक विद्यार्थी यांच्या पालकांचे आधार कार्ड गोळा करत अपार आईडीच्या कामाला लावले आहे. शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये शिक्षण विद्यार्थ्याची युनिक आयडी ऑटोमेटेड परमनंट अॅकॅंडमिक अकाउंट रजिस्ट्री (एपीएआर) तयार करण्याचे काम शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपवले आहे. परंतु एपीएआरच्या कामालाही गती मिळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आता दिवाळीनंतर शाळा सुरू झाली. आता शिकवायचे तर कधी आणि इतर शालेय काम करायचे कधी असा प्रश्न गुरुजींना पडला आहे. एकीकडे शिक्षण विभागाचे अधिकारी अपार यांच्यावर लवकरात लवकर ओळखपत्र तयार करण्यासाठी दबाव आणत आहेत. दुसरीकडे, यू-डायसप्लस पोर्टलवर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील आणि पालकांचे आधार कार्ड तपशील जुळत नाहीत. कोणतीही दुरुस्ती करण्याचा अधिकार शाळेला नसल्याने अधिकच अडचणी वाढल्या आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांच्या आणण्यासाठी आता APAAR ‘अपार’ (ॲटोमेटेड पर्मनंट ॲकेडमिक रेजिस्ट्री) आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजीलॉकर’च्या मदतीने ‘अपार’मधून सर्व शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येतील. आधार कार्डच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना आता अपार आयडी तथा कार्ड दिले जाणार आहे. सुरवातीला नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ते कार्ड देण्यात येणार होते, पण आता सर्वांनाच दिले जात आहे. या अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. पालकांचे व मुलाचे आधार कार्ड, पॅन किंवा मतदान ओळखपत्राचा वापर यासाठी केला जाणार आहे. apaar.education.gov.in या वेबसाईटवर याचे रजिस्ट्रेशन होणार आहे.

पालकाचे पोर्टलवर एक नाव तर आधारवर दुसरेच

यू-डायसप्लस पोर्टलवर शालेय विद्याथ्र्याचे नाव त्याचे मूळ नाव अशी नोंद आहे. परंतृ बहुतेक विद्याथ्याच्या नावापुढे आडनाव नसल्याने लावल्याने हा प्रकार घडत आहे. यू डायस प्लस पोर्टिलवर पालक विद्याथ्यचि नाव एक आहे. मात्र आधार वर पालकाचे नाव बदबदलुन आहे. आडनाव जुळत नसल्याने अपार आयडीला आडकाठी येत आहे.अपार आयडीच्या कामात गुरूजी व्यस्त यू-डायस पटिलवरून तयार केला जात आहे आयडी विद्यार्याच्या पोर्टलवर प्रविष्ट केलेले तपरशील जसे की नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख इ. आधार कार्ड प्रमाणेच असणे आवश्यक आहे आणि पालकांच्या आधार तपशीलासह देखील असणे आवश्यक आहे.अडचण अशी आहे की अनेक चुका सुधारण्यासाठी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, परंतु माहितीच्या अभावामुळे ते अपूर्ण राहाते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा