क्रेन चोरटा पोलिसांच्या ताब्यात, मल्हारपेठ पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी शशिकांत माथने
पैठण (मल्हारपेठ) :- दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा. फौजदार प्रदिप साळवी, पोलीस हवालदार संजय मोरे आणि होमगार्ड प्रदिप निकम पेट्रोलिंग ड्युटी करत होते. यावेळी, मरळी ते ढेबेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर सुतारमळा येथे टोइंग क्रेन (क्र. एम.एच.०९ सी.ए.६३०६) उभी असल्याचे आढळले.पोलिसांनी घटनास्थळी
जाऊन चौकशी केली असता, एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अधिक चौकशीअंती त्याने सांगितले की, त्याच्याकडे असलेली टोइंग क्रेन कराड शहरातून चोरी केली होती.कराड शहर पोलीस ठाण्यातील माहितीप्रमाणे, सदर टोइंग क्रेन प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १२८७/२०२४ भा.द.वि. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला होता. आरोपीला आणि टोइंग क्रेनला पुढील कारवाईसाठी कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, आणि मा. विजय पाटील, पोलीस उपअधीक्षक पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा. फौजदार प्रदिप साळवी, पो. हवा. संजय मोरे आणि होमगार्ड प्रदिप निकम यांनी केली आहे.आरोपीचे नाव: रविंद्र विठ्ठल चोरगे (वय २१ वर्षे), राहणार चोरगेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण, जि. सातारा.चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ पोलीस ठाणे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space