नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिबट्याची गावात दहशत केली ६ जनावरांची शिकार… – आजचा महाराष्ट्र

बिबट्याची गावात दहशत केली ६ जनावरांची शिकार…

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

नागपुर (रामटेक) :- माहुली हद्दीतील घुकसी वितभट्टा परिसरात बिबट्यांचा खुलेआम वावर वाढला आहे. रानावनात वास्तव्य करणारा बिबट्या गावठाण भागात नरजेस पडत असल्याने बिबट्याची ग्रामस्थांच्या मनात चांगलीच धास्ती बसली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक प्रादेशिक वनविभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत माहुली हद्दीतील घुकसी विटभट्टा परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या ६ वासरांवर हल्ला करून ठार केले.प्राप्त माहितीनुसार, पेट्रोल पंप डुमरी येथील रहिवासी उमाशंकर

जगदीश गुहिरे यांना घुकसी येथील वीट भट्टा परिसरात स्वतःच्या मालकीचे सुमारे ५० ते ६० जनावरे गोठ्यात बांधले होते. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यात बांधलेल्या ६ वासरांवर हल्ला करून ठार केले. यात ४ गायीच्या आणि २ म्हशीच्या वासरांचा समावेश आहे.शेतकऱ्याने घटनेची माहिती वनरक्षक डी.जी.विभूते यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ आहे. या करिता वनविभागाने धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा