नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रियकरा सोबत मिळून बहिणीने काढला भावाचा काटा – आजचा महाराष्ट्र

प्रियकरा सोबत मिळून बहिणीने काढला भावाचा काटा

सचिन चौरसिया ( तालुका प्रतिनिधी )

खिंडसी तलावातील लावरीस मृतदेहचा उघळलं खुणाचे रहस्य हत्या करुन मृतदेह फेकले तलावात

नागपुर (रामटेक) :- भावाच्या रोजच्या जाचाला कंटाळून बहीनीने काढला भावाचा काटा भावाला संपविण्यासाठी बहीनिने आपल्या प्रियकर व त्यांचा साथीदारा सोबत त्यांला सिंडसी येथे आणल्या नंतर गळा दाबुन त्याची हत्या करुन मृतदेह तलावात फेकुन दिला हि घटना १७ एप्रिला समोर आली. आई व बहीन हत्येमागे असल्याचें पोलीसांनी सुरु केला पुढील तपास.खिंडशीत सकाळी पोहायला जाणाऱ्यांना लोकांना तलावात मृतदेह तरंगताना दिसला. वृत्तपत्रामधुन प्रसिद्ध झालेले मृतदेहाचे वर्णनवाचुन २६ एप्रिलला नागपूर येथे मिसिंग तक्रारीवरून मृतक व्यक्ती रजत कैलास उघडे वय २५, रा. आशीर्वादनगर, नागपूर हा असल्याची माहिती मिळाली. मृतकाची आई व नातेवाइकांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये येऊन मृतकाचे साहित्य व कपड्यावरून ओळख पटवून तो रजत कैलास उघडे असल्याचे सांगितले. पोलीसांनी तातडीने रजतच्या जवळच्या मित्रांची माहिती काढून त्यांचेकडे विचारपुस सुरु केली. तेव्हा पोलीसांना कळाले की, रजत मागील ६ महिण्यापासुन घरीच होता. दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने कामधंदा करीत नव्हता. दारुच्या नशेत असल्यावर तो घरच्यांना खूप त्रास देत होता. त्याचे घरचे लोक त्याचे त्रासाला कंटाळले होते. खात्रीशिर माहिती हाती लागल्यावर पोलीसांनी आभा व तिची आई हिच्याकडे रजत बाबत सखोल चौकशी केली तेव्हा दोघींही वेगवेगळया घटना सांगुन पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे पोलीसांना लक्षात आले. सरते शेवटी आभा हिचेवर अधिक संशय बळावल्याने तिची कसून चौकशी केली. तिचा मोबाईल फोन तपासून तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला असता अत्यंत महत्वपुर्ण माहिती पोलीसांचे हाती लागली. अतुल राजू भामोडे वय ३१ वर्ष याचेसोबत आभा हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. प्रियसीला रजतच्या त्रासातुन बाहेर काढायचे होते. अतुल भामोडे याने लगेच त्याचा मित्र पप्पू श्यामलाल बुरडे, वय २८ वर्ष रा. कळमना, याला सोबतीला घेतले. अतुल याने त्याचदिवशी रजतला दारु पिन्याचा बहान करुन सोबत घेवून येण्यास म्हटले. त्यानंतर अतुल याने रजतला दारु पाजली, दारु पिल्यावर अतुल, पप्पू आणि रजत मोटर सायकलने म्हाळगी नगर चौक नागपूर येथून रामटेक येथे आले. तो खूप नशेत आहे त्याला जिवे ठार मारत नाही त्याऐवजी त्याचे हातपाय तोडतो. शेवटी अतुल याने प्रियसीच्या म्हणन्यानुसार रजत याचा गळा दाबवून त्याला ठार केले. दारुच्या नशेत असल्याने रजतला अतुल याने सहजरित्या संपविले. त्यानंतर अतुल याने त्याचा मित्र पप्पू याचे मदतीने रजतचा मृतदेह खिंडशी तलावात फेकून दिला. यानंतर अतुल आणि पप्पू हे दोघे आभा आणि तिच्या आईला रजत याला जिवे ठार केल्याची माहिती दिली. अतुल आणि पप्पु हे सराईत अपराधी असल्याचे पोलीसांना तपासादरम्यान माहिती मिळून आली. भावाच्या त्रासाला कंटाळून बहीणीने प्रियकराला खुनाची सुपारी दिली या रहस्यमयी घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पोलीसांनी दिवसरात्र सतत तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा