नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामपंचायत कारीवणे मार्फत घनकचरा व्यवस्थापने साठी कचरा कुंड्यांचे वाटप – आजचा महाराष्ट्र

ग्रामपंचायत कारीवणे मार्फत घनकचरा व्यवस्थापने साठी कचरा कुंड्यांचे वाटप

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे या करिता प्रत्येक कुटुंबास कचरा कुंड्याचे वाटप करण्यात आले.कुंड्या वाटपासाठी आलेला खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून करण्यात आला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी या करिता ग्रामपंचायत कारविणे प्रयत्नशील असल्याचे ग्रामसेवक अभिजीत माने यांनी सांगितले.मागील काळात ग्रामपंचायत कारीवणे हर घर जल व ओ.डी. एफ.प्लस म्हणून घोषणा झाली आहे.सदर 

कचरा कुंड्याचे वाटप करीत असताना ग्रामपंचयात च्या वतीने घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन प्रभावी होण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास माजी सभापती बाबुराव चोरगे. सरपंच,गीता चोरगे.उपसरपंच बबन जोशी,ग्रामपंचायत सदस्य अनंता चोरगे,लक्ष्मण भुवड,वंदना म्हसकर,लक्ष्मी चोरगे-ग्रामसेवक अभिजित माने ,किसन चोरगे,तुकाराम म्हसकर,गणेश भुवड, बाळकृष्ण म्हसकर,अनंत बरजे, सखाराम चोरगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा