छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल शिबीर उत्साहात पार

प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी ( खेड) :- महसूल विभागाच्या वतीने “महसूल सप्ताह २०२५” निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीराचे आयोजन ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, खवटी येथे करण्यात आले. या शिबीरात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच शालोपयोगी आणि तत्सम दाखल्यांचे तात्काळ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार श्री. राजु दळवी यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत ग्राम महसूल अधिकारी श्रीम. दीपाली शिंदे यांनी शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंडळ अधिकारी श्री. उमाकांत देशमुख (भरणे) यांनी शासनाच्या उपक्रमामागील हेतू विषद करत अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमास भरणे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच पंचक्रोशीतील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे आयोजन मा. वैशाली पाटील मॅडम, उपविभागीय अधिकारी (उपविभाग – खेड) यांच्या सुचनेनुसार आणि मा. सुधीर सोनवणे रावसाहेब, तहसीलदार (खेड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space