आईबाबा प्रतिष्ठान तर्फे वह्या व शालेय वस्तू वाटप !

प्रतिनिधी सतिश वि.पाटील
मुबंई :- मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळाव्यात, या दृ ष्टीकोनातून *ॐ श्री स्वामी उदयानंदगिरी पंचमुखी शिवमंदिर* आणि *आई बाबा प्रतिष्ठान* तर्फे “मोफत वह्या वाटप” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत पंचमुखी शिव मंदिराचे विश्वस्त श्री. अनिल विठोबा वैती आणि श्री. महेंद्र विठोबा वैती यांच्या शुभ हस्ते मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम
नवघर कोळीवाडा, मुलुंड पूर्व येथे संपन्न झाला.शैक्षणिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हि अनिल विठोबा वैती यांची कृतज्ञता कौतुकास्पद असून, मोफत वह्या व शालेय वस्तू वाटप या अभिनव उपक्रमाचे सौ. अंकित निमा यांनी कौतुक केले. दरम्यान शहरातील सर्व भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे अनिल विठोबा वैती यांनी या वेळी सांगितले.या वह्या वाटप कार्यक्रमासाठी विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space